Arjun Khotkar on Dhule Money : अनिल गोटे यांचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले
Arjun Khotkar on Dhule Money : अनिल गोटे यांचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले
Dhule News : धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात (Gulmohar Government Rest House) आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये आणल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ला बाहेरून कुलूप लावून तेथेच ठाण मांडले होते. तसेच, ही खोली जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच उघडण्यात यावी, अशी मागणीही गोटे यांनी केली होती. अखेरी पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या खोलीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी खोली क्रमांक 102 चे कुलूप कटरने तोडत अधिकाऱ्यांनी खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीत घेतलेल्या झडतीत तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार 200 रुपयांची रोकड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसीय दौऱ्यासाठी सध्या धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे.
या दौऱ्यात समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. एकूण 29 आमदारांचा समावेश असलेल्या या समितीचे नेतृत्व आमदार अर्जुन खोतकर करत आहेत. त्यापैकी 11 आमदार सध्या धुळ्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, या आमदारांना देण्यासाठीच पाच कोटी रुपयांची रक्कम गुलमोहर विश्रामगृहात आणण्यात आली होती, असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.