ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 May 2025
मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठावाड्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग...भंडाऱ्यात भातपीक भूईसपाट तर हिंगोली ओढ्याला पूर
मान्सूनपूर्व पावसाने पुण्याला झोडपलं, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरं आणि दुकानात पाणी, चिंचवडमध्ये सर्वाधिक पाऊस
पुढचे चार दिवस अरबी समुद्र खवळण्याचा हवामान विभागाचा अंदाज, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छिमारांना आवाहन
अलमट्टी धरणाच्या उंची वाढविरोधात आज कोल्हापूर आणि सांगलीतील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक...कर्नाटक सरकारकडून उंची वाढवण्याचा निर्णयाला स्थानिकांचा विरोध.
ऑपरेशन सिंधूची माहिती देण्यासाठी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ आज रवाना होणार... शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला हे जगाला सांगा, खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन
'ऑपरेशन सिंदूर'च्या पोस्टरवॉरनंतर काँग्रेस भाजप आयटी सेलच्या अमित मालवीयांविरोधात तक्रार दाखल करणार...ऑपरेशन सिंदूर हे क्षुल्लक युद्ध, खरगेंची टीका...तर काँग्रेस पाकिस्तानला ऑक्सिजन देण्याचं काम करत असल्याचा भाजपचा निशाणा...
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची चौकशी सुरूच...क्लाउड स्टोरेजसह अनेक व्हिडीओ मोबाईलमध्ये आढळले...राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील व्हिडिओबाबतही चौकशी