Dharashiv Marathwada University: मविआच्या कार्यकर्त्यांचा विद्यापीठ उपकेंद्राच्या कार्यक्रमात गोंधळ
Dharashiv Marathwada University: मविआच्या कार्यकर्त्यांचा विद्यापीठ उपकेंद्राच्या कार्यक्रमात गोंधळ. धाराशिव इथल्या विद्यापीठाचे उपकेंद्रासाठी बांधकामासाठी पैसे निधीची तरतूद झालेली असूनही त्याला कुलगुरू वेगवेगळी कारण सांगून त्या बांधकामाला अडकाठी आणत आहेत असा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज दाराचे विद्यापीठ उपकेंद्राच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घातला. तो कार्यक्रम बंद पडला आहे. हा कार्यक्रम कुलगुरूंच्या उपस्थितीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होता. महाविकास आघाडीच्या वतीने माजी सिनेट मेंबर संजय निंबाळकर आणि संजय दुधगांवकर यांनी आंदोलन सुरू केले आहे.