Dhananjay Munde | करुणा शर्मा यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचा खुलासा, याचिका दाखल केल्याचीही माहिती
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील काही गंभीर आरोप मागे घेतल्यानंतर आता कुठे त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत होत्या. किंबहुना बीड आणि औरंगाबादमध्ये गेलं असता मुंडे यांचा जंगी सत्कारही करण्यात आला. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्यापुढील अडचणी वाढच्याचं पाहायला मिळत आहे.