राज्य सरकारचा ओबीसी आणि मराठा समाजात फुटीचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाषण

Continues below advertisement
महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन चौफेर टीका केली. जनतेला उत्तरदायित्व असलेला भाजप एकमेव पक्ष आहे. कोरोना संकटात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आहे, एकही घरी बसलेला नाही असा अप्रत्यक्ष टोला देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. या मंत्र्यांना झोप कशी लागते. 15 लाख लोक राज्यात कोरोनाग्रस्त आहेत. राज्यात फक्त एकच धंदा सुरुय तो म्हणजे बदल्यांचा धंदा. प्रेताच्या टाळूवरचं लोणी राज्यकर्ता खात आहेत. कोरोनाचा बाजार केला आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram