जनतेनं ग्राम पंचायतीत भाजपल्या दिलेल्या समर्थनाबद्दल आनंद, भाजपच नंबर 1 चा पक्ष - देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

ज्यातील गावागावातील लोकांना भाजपला समर्थन दिलं आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीआहे.

भाजपला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कोरोना काळात, लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार लोकांच्या पाठिशी खंबरपणे उभं राहिलं आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसह कुणालाही मदत केलेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या महाविकास आघाडी सरकारविरोधात रोष आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊनदेखील भाजप नंबर वनचा पक्ष बनलाय, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram