Devendra Fadnavis | धोकादायक ठिकाणांच्या यादीवर महापालिकेचं काम किती? फडणवीसांचा सरकारला सवाल
देवेंद्र फडणवीसांनी सरकारला काही सवाल केलेत, मागे मुंबईत भिंत कोसळली होती त्यावेळी महापालिकेने मुंबईतील धोकादायक स्पॉटची यादी तयार केली होती. त्या यादीपैकी किती स्पॉटचं काम झालं याबाबत काहीच माहिती नाही. पंपिंग स्टेशन का तयार होतं नाही याकडे गांभीर्याने पाहिला हवं. पंपिंग स्टेशनची कामं पंधरा वर्षांपासून पेंडिंग आहेत. महापालिकेने त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. असे विविध आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केम्स कॉर्नर येथे भिंत कोसळलेल्या परिसराला भेट दिल्या नंतर केले आहेत.