
Fadnavis Meets Anna Hazare | देवेंद्र फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, अण्णा 30 तारखेच्या आंदोलनावर ठाम
Continues below advertisement
अहमदनगर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राळेगणसिद्धीत येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत माजी मंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन हे देखील भेटले. फडणवीस आणि अण्णा हजारे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. मात्र अण्णांची मागणी मान्य न झाल्याने अण्णांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.
Continues below advertisement