CM at Serum Institute | कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दिलासा
पुणे : देशाला कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची बातमी लागल्याचे कळताच काळजाचा ठोका चुकला. दुर्घटना घडली तेथील दोन मजले वापरात होते. तिसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. कोव्हीडची लस जिथे बनवली जाते त्या विभागाला आगीचा फटका बसला नाही. प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
Tags :
SII Pune Fire Sii Covid Vaccine SII Fire Serum Institute Of India News Serum Institute Of India Fire Uddhav Thackeray Covishield Maharashtra