ABP News

Clean chit to Deputy CM | राज्य सहकारी बॅंक घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट, ईडीचा विरोध

Continues below advertisement

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचलनालयाने विरोध केला आहे.

या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांची नावं होतं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावरच ठपका ठेवला होता. तर रिझर्व्ह बँकेने 2011 मध्ये तत्कालिन संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram