Ajit Pawar reaction | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
फेब्रुवारीला पुणे शहरातील वानवडी परिसरात एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पूजा चव्हाण असं या तरूणीचं नाव होतं. सोशल मीडियावर 'टिक-टॉक स्टार' अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील विदर्भातल्या एका बड्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असतांना आणखी मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया दिली आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?
पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरूणी अभ्यासासाठी पुण्याला रहायला आली होती. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती भाऊ आणि मित्रासोबत रहात होती. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. रविवारी 7 फेब्रुवारीच्या रात्री तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. याला कारण ठरलंय या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन ऑडिओ क्लिप. यात पुजा, तिचा मित्र आणि संबंधित मंत्र्यांचे संभाषण आहे. संभाषणाच्या भाषेवर त्यांच्यात नेमकं काय संबंध होते? हा प्रश्न निर्माण होतो आहे. मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram