Deputy CM Ajit Pawar | विनाशकाले विपरित बुद्धी म्हणत अजितदादांचं गोपीचंद पडळकरांवर टीकास्त्र
जेजुरी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. पुतळ्याचं उद्घाटन झालं असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.