Mumbai Local MNS Protest | लोकलसेवा सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक, सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी
मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज (21 सप्टेंबर) सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. तर ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं. ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Tags :
Manse Mumbai Local Start Avinash Jadhav Sandeep Deshpande Local Special Report MNS Raj Thackeray Mumbai Local