#Congress महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची उघड नाराजी, किमान समान कार्यक्रम राबवण्याची मागणी

नवी दिल्ली : महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसची नाराजी उघडपणे बाहेर आली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी ठाकरे सरकारवर दबाव टाकल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनं किमान समान कार्यक्रम राबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजांसाठी असलेल्या योजना राबवाव्यात, त्यांना निधी देण्यात येवा एसं एच के पाटलांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola