Raosaheb Danve Exclusive | ... म्हणून घेतली शरद पवार-संजय राऊतांची भेट - रावसाहेब दानवे

Continues below advertisement

नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत एबीपी माझाने मंत्री दानवे यांची प्रतिक्रिया घेतली. दानवे म्हणाले की, राज्यात साखर कारखान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक कारखान्यांचे अकाउंट एनपीएमध्ये गेले आहेत. बँका पैसे उपलब्ध करून देत नाहीयेत. शेतकरी पण त्यामुळे अडचणीत येऊ शकतो यासाठी सरकारने काय केले पाहिजे. यासाठी शरद पवार यांची भेट घेतली, असं दानवे म्हणाले.


दानवे म्हणाले की, कांद्याबद्दल निर्णयामुळे शेतकरीही नाराज आहे. मंगळवार नंतर आम्ही या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटणार आहोत. किती लोकांना कोरोनामुळे भेटीची परवानगी मिळते हे कळेल. शरद पवार हे राज्यातले ज्येष्ठ आणि जाणकार नेते आहेत. मी जरी मंत्री असलो तरी आम्ही इतकी वर्ष अनेक ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. या महिन्यात त्यांचे मला साखरेच्या प्रश्नाबाबत तीन फोन आले, असंही दानवेंनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram