आषाढी, कार्तिकीनंतर पंढरपूरची माघी यात्राही रद्द करण्याचा निर्णय, पंढरपुरात त्रिस्तरीय नाकाबंदी
आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार असून याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री, आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम 29 फेब्रुवारी पर्यंत सुरू ठेवल्याने यात्रा जत्रा भरण्यास मनाई करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाची नवीन वर्षात येणार माघी यात्रेचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत असल्याने प्रशासनाने या यात्राही भाविकांविना करण्याचे नियोजन करीत आहे.
Tags :
Maharahstra Lockdown Sunil Diwan Pandharpur Temple Vitthal Mandir Vitthal Temple Corona Effect Pandharpur Covid Corona Coronavirus