Dadar Market Crowd | दादरच्या मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी, नियमांचा विसर
Continues below advertisement
शनिवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादरच्या मुख्य बाजरपेठेत हरतालिकेला अगदी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे लोकांनी खरेदीसाठी हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोशल डिस्टंसिंगमध्येच बाप्पाचं आगमन आणि विसर्जन पार पाडण्यासाठी प्रशासन रोज नव नव्या नियमावली तयार करतंय मात्र लोकांवर त्यांचा खरंच परिणाम होतोय का? असा सवाल आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू दादरमधून खरेदी करण्यासाठी मुंबईसह उपनगरातील नागरिक या मार्केटमध्ये येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस आहे. मात्र या पावसातही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत.
Continues below advertisement