Dadar Market Crowd | दादरच्या मार्केटमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी, नियमांचा विसर,मास्कचा वापरही नाही
Continues below advertisement
मुंबईतल्या वांद्रे, दादर रेल्वे स्थानकासह बाजारांमध्ये मुंबईकरांची मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी ७ ते १२ या वेळेत सामान्य मुंबईकरांना प्रवासाची मुभा नाही. तरी, वांद्र्यासह अनेक रेल्वे स्थानकात प्रवासी मुंबईकर विनामास्क आणि सामाजिक अंतर न पाळता गर्दी करताना दिसले. त्यामुळे या मुंबईकरांना लॉकडाऊन हवाय का? असा सवाल उपस्थित होतोय. तरी, कालच मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतर पाळण्याचं आवाहन केलंय आणि लॉकडाऊन टाळण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम सामान्य जनतेला दिलंय.
Continues below advertisement