Cyclone Nisarga Damage | निसर्ग चक्रीवादळामुळे राजगडावरील पद्मावती मंदिराचे पत्रे उडाले, मंदिराचं मोठं नुकसान

बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानं स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरील पद्मावती देवीच्या मंदिराचं मोठं नुकसान केलं. वादळी वारा आणि पावसाच्या माऱ्यानं मंदिरावरील पत्रे उडून गेले. तर, राजगडावरील पद्मावती माचीला देवीच्या मंदिराचं नाव लाभलंय. त्यामुळे राजगडावर प्रवेश करताच पद्मावतीचं दर्शन घेऊनच आपला पुढचा प्रवास सुरु होतो. तरी, राजगड संवर्धन मोहिम समितीच्या कार्यकर्त्यांनी गडावर पोहचून उडून गेलेले पत्रे गोळा केलेत. सध्या याच समितीकडून मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola