कोविड योद्धा डॉ.संदिप आणि डॉ.हिमांगी लग्नाच्या बेडीत, नवदाम्पत्य लवकरच कोविड सेंटरमध्ये रुजू होणार
मुंबईत कोविड वॉरिअर जोडपं लग्नाच्या बेडीत अडकलं, डॉ. हिमांगी देवराज आणि डॉ. संदीप पुराणे मुंबईतील एका कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करतात. त्यांचं एप्रिलमध्ये लग्न होणार होतं, पण कोविडच्या प्रादुर्भावानंतर त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. अखेर आज साध्या पद्धतीनं, काही सहकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. संदीप आणि हिमांगी लग्न पार पडलं.