Vaccination begins in 10 days | येत्या दहा दिवसात भारतात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता

Continues below advertisement
नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या 10 दिवसात देशात लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना वॅक्सिन वापरण्यापूर्वी संमती घेणे आवश्यक आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 10 दिवसानंतर ही लस देता येऊ शकते, आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातील विविध राज्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे 3 जानेवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हशील्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोवाक्सिन' यांना आपत्कालीन परिस्थितीत लसीचा वापर करण्यास परवानगी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram