Majha Vishesh | शिवसेनेचं गुजराती प्रेम मराठी माणसाला आवडेल? भाजपची व्होट बॅंक शिवसेना फोडणार?
मुंबई : भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा शिवसेनेने दिला आहे. येत्या 10 जानेवारीला शिवसेनेने मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी या संदर्भातील पत्रक जारी केलं आहे.