coronavirus | कोल्हापुरात कोरोना संशयित 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयित 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्तीला 15 मार्चला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) दाखल करण्यात आलं होतं. मृत व्यक्तीचे सॅम्पल्स तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट्स येणार होते, मात्र रिपोर्ट्स येण्याआधीचा या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झालाय का हे रिपोर्ट्स हाती आल्यानंतर स्पष्ट होईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola