#Corona पारसी समाज नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कोरोनावरील लस पारसी समाजासाठी राखीव ठेवणार?

कोरोनासारख्या महामारीवर लस तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना ऑक्सफर्डसोबत सिरम इन्स्टिट्यूट जर कोरोनावर वॅक्सिन काढण्यात यशस्वी झाली तर 60 हजार वॅक्सिन पारसी समुदायसाठी आरक्षित केलं जाणार आहे. 

60 हजार पारसी समाजाच्या लोकांना ही लस आरक्षित ठेवून उपलब्द करून द्यावी अशी मागणी बोंबे पारसी पंचायतचे माजी चेअरमन दिनशॉ मेहता यांनी सायरस पूनावाला यांच्याकडे केल्यानंतर आता त्याला सिरम इन्स्टिट्यूट कडून सुद्धा सकारत्मक प्रतिसाद मिळाला आहे. सिरम इन्स्टिट्यूटने लस तयार केली तर एका दिवसाची निर्मिती पारसी समुदायसाठी ठेवू असा सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनवाला यांनी ट्विटर माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola