Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण, देशात वर्षभरात 157 कोटी डोस

देशासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालंय. 16 जानेवारी २०२१ पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचे पाहायला मिळतंय. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola