दिल्ली पोलिसांकडून खलिस्तानी टूलकिटचा पर्दाफाश, भारताच्या बदनामीसाठी खलिस्तानी 'टूलकिट'?

दिल्ली सीमाभागात झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस सोशल मीडियावर करडी नजर ठेऊन आहे. आतापर्यंत पोलिसांनी 300 सोशल मीडिया हँडल निलंबित केले आहे. यात (ग्रेटाचं नाव न घेता) तीने अपलोड केलेल्या टूलकिट वर नजर ठेवली जात आहे. या टूलकिटच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात होता. भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव होता. याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 124 ए (राजद्रोह), 153 ए, 153 आणि 120 बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, आम्ही तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहोत. दिल्ली पोलिसांचे सायबर सेल याचा तपास करत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola