Cold Wave | नाशिक शहरावर धुक्याची चादर, निफाडमध्ये पारा 6 अंशांवर, परभणीत 9.6 अंशांवर पारा घसरलाे

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चांगलाच घसरत असल्याच चित्र बघायला मिळते आहे. नाशिकसह निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून निफाडला 6 तर नाशिकमध्ये 9.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली गेली आहे. गुलाबी थंडी आता कडाक्याची जाणवू लागल्याने उबदार कपड़े घातल्याशिवाय घराबाहेर पडणं नाशिककरांना अवघड झालय. एकीकडे ही परिस्थिती जरी बघायला मिळत असली तरी दुसरीकडे गरमा गरम चहाचा आस्वाद घेत नाशिककर या थंडीचा आनंद लूटतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola