शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचा मृत्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्पण केली आदरांजली
Continues below advertisement
मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे आतापर्यंत दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात असत. सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची ओळख होती.
Continues below advertisement