CM Eknath Shinde उशिरा दिल्लीत दाखल, उद्याची सुनावणी आरक्षणावरही खलबतं? : ABP Majha

Continues below advertisement

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना पक्षात उद्या राष्ट्रीय पातळीवरही उद्या फूट  होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या माहितीनुसार राज्य विधानसभेतल्या ४० आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे लोकसभेतील १२ खासदारही बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिंदे गटाच्या आज झालेल्या बैठकीला १४ खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती राखल्याची माहिती आहे. शिंदे गटाकडून उद्या वेगळ्या गटाच्या स्थापनेबाबत लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. ते बारा खासदारांना सोबत घेऊन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते असतील, तर खासदार भावना गवळी यांना मुख्य प्रतोदपदी कायम ठेवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram