CM Eknath Shinde रात्री उशिरा दिल्लीत दाखल, शिवसेनेच्या 12 खासदारांसह मोदींना भेटण्याची शक्यता
आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष दिल्लीकडे असणार आहे.. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल उशीरा रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत... राज्यात धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत देखील ठाकरेंना हादरा देण्याच्या तयारीत आहेत.. शिवसेनेच्या १२ खासदारांचा गट तयार करून एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.. काल पार पडलेल्या या ऑनलाईन बैठकीत या १२ खासदारांनी उपस्थिती लावल्याचं कळतंय.. दरम्यान उद्या महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.. तसंच मंत्रिमंडळ विस्तारही खोळंबला आहे. या अनुषंगानं देखील मुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जातेय..