CIDCO |अखेर सिडकोकडून टाळेबंदीच्या कालावधीतील हप्त्यांचं विलंब शुल्क माफ,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
सिडकोच्या 2018-19 मधील घर विजेत्यांना अखेर सिडकोने दिलासा दिला आहे. सिडकोने टाळेबंदीच्या कालावधीतील कर्जाच्या हप्त्यांवरील विलंब शुल्क माफ़ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. याबाबत अधिकृतरित्या सिडकोकडून एक पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सदनिकांचे हप्ते भरता येणार आहेत. सिडकोच्या या निर्णयानंतर हजारो घर विजेत्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.