Uddhav Thackeray Speech :कधी मला डोळा मार,कधी पवारांना डोळा मार, मोदींच्या ऑफरवरुन ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Speech, Chhatrapati Sambhajinagar : "काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ऑफर दिली होती. दरम्यान पीएम मोदींच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. "नेमकं तुम्ही ठरवा काय करायचे आहे ते, आजपर्यंत तुम्ही सर्व फोडलतं. शिवसेना फोडली-तोडलीत. राष्ट्रवादी फोडली-तोडलीत तरी कधी मला डोळा मार आणि पवारांना डोळा मार, आज सकाळी पवारांना डोळा मारला. एकीकडे म्हणायचे नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि आता म्हणायचं आजा मेरी गाडी मे बैठ जा" असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola