Sambhaji Nagar K.C Rao Sabha : संभाजीनगरमध्ये के. चंद्रशेखर राव यांची सभा, सभेची जोरदार तयारी
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. चंद्रशेखर राव यांची मराठवाड्यातील ही तिसरी सभा असणार आहे. या सभेच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक माजी आमदार, नाराज नेते बीआरएसमध्ये दाखल झालेत. बीआरएसने अबकी बार कीसान सरकार असं म्हणत या सभेचं आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे.