Sharad Pawar : प्रधानमंत्री हा देशाचा असतो पण भाषण ऐकल्यावर वाटलं ते फक्त भाजपचे पंतप्रधान आहेत
Sharad Pawar : प्रधानमंत्री हा देशाचा असतो पण भाषण ऐकल्यावर वाटलं ते फक्त भाजपचे पंतप्रधान आहेत देशाचं राजकारण योग्य रस्त्यावर आणायचं पाहिजे यासाठी देशपातळीवर आघाडी केली. त्यासाठी पक्ष, खासदार नेते एकत्र आले. इथ येण्यापूर्वी मोदी साहेबांचे भाषण ऐकत होतो. देशाचा प्रधानमंत्री हा देशाचा असतो. मात्र भाषण ऐकल्यावर असे वाटले की ते भाजपचे पंतप्रधान आहेत. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. माझ्या हातात सत्ता द्या ५० दिवसात महागाई कमी करू म्हणाले पण त्या कमी करण्याऐवजी वाढल्या. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढली. देशात आज बेकारांची संख्या वाढली.