Sambhajinagar Vits Hotel Controversy : संभाजीनगरच्या विट्सच्या हॉटेल लिलावाचा इतिहास काय सांगतो?
व्हिट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांनी थेट इशारा दिलाय..
हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून संजय शिरसाट बाहेर
उद्या माझा मुलगा निविदा प्रक्रियेतून बाहेर पडेल-शिरसाट
आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करुन घ्यावा-शिरसाट
७ वेळा लिलावाची नोटीस काढली,कुणी पुढं आलं नाही-शिरसाट
६७ कोटींना संजय शिरसाट घेणार होते हॉटेल
संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही-शिरसाट
दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अंबादास दानवे आणि काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शिरसाटांवर निशाणा साधलाय...पाहूयात...
शिरसाठ जर हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडले तर त्यांना २० लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. कारण लिलावातील अटी पाळल्या नाहीत तर अनामत रक्कम जप्त होण्याची तरतूदच लिलाव प्रक्रियेत आहे अशी प्रतिक्रिया संभाजीनगरचे एसडीएम व्यंकट राठोड यांनी दिली.