Sambhaji Nagar Loan For Fodder : सर्जा-राजाचा उपाशी, दागिने गहाण ठेवून मालकाने खरेदी केला चारा!

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील भीषण पाणीटंचाईचा (Water Scarcity) फटका जसा माणसाला बसतोय तसाच मुक्या जनावरांनाही बसतोय .  छत्रपती संभाजी नगरमध्ये चाऱ्याअभावी गोशाळा कशा चालवायच्या, हा प्रश्न  गोशाळा चालकांना पडलाय. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपले घरातील दागिने गहाण (Gold Loan) ठेवून चारा खरेदी केला आहे. आता त्यांच्याकडे केवळ दोन दिवसच पुरेल एवढा चारा (Fodder) शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी गोशाळाला चारा देण्याचं आवाहन केलंय.

खपाटीला गेलेली  मुक्या जरांवरांची पोटं, चारा नसलेली  दावणी अन् चाऱ्यासाठी वाट पाहणाऱ्या जनावरांचा हंबरडा, हे चित्र आहे मराठवाड्यातील संभाजीनगरच्या पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळेतीळ.... दुष्काळाचा फटका जसा माणसांना बसतोय तसाच या मुक्या जनावरांना देखील बसतोय.त्यांना ही दुष्काळाचा सामना करावा लागतोय. डोळ्यासमोर आलेल्या दावणीत एकावेळी मिळालेलं चारा पुन्हा कधी मिळेल याची वाट या जनावरांना पहावे लागतेय...लेकरांप्रमाणे पालन पोषण करून जगावलेल्या या मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी परमेश्वर नलावडे प्रचंड धरपड करतायत... एवढंच काय तर त्यांनी घरातील सुनेचं सोनं गहाण ठेवून जनावरांसाठी चारा विकत आणला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram