Prakash Ambedakar : छ. संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांची औरंगजेबाच्या कबरीला भेट
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. राज्यात औरंगजेबाच्या फोटोवरुन सुरु असलेला वाद पाहता प्रकाश आंबेडकरांनी मजारीला भेट देणं म्हणजे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर आहेत. आता यावर काय प्रतिक्रिया उमटते ते पाहावं लागेल..