Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर पालिकेकडून अखेर कारवाई करण्यात आलीये..  मनपाचे १०० हून अधिक कर्मचारी अधिकारी दाखल झाले होते. मतीन पटेलांच्या कुटुंबीयांनी मनपा पथकाचं स्वागत करत गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. फुलांच्या माळा आणि संविधानाची प्रत देऊन हे स्वागत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महानगरपालिकेने कारवाईबाबत याआधी नोटीस काढली होती. या विरोधात मतीन पटेलने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर काल सुनावणी झाली मात्र खंडपीठाने मतीन पटेलला कोणताही दिलासा दिला नाही. कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देण्याबाबत देखील कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे पालिकेकडून  अधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला.

नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय देऊन ज्या घरात लपवलं होतं ते घरही आज मनपाने जमीनदोस्त केलं. सकाळी नगरसेवक मतीन पटेल यांच्या राहत्या घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला. त्यानंतर मतीन पटेलांच्या संभाजीनगरमधल्याच दुसऱ्या घराकडे मनपा पथकाने कूच केली. याच घरात निदा खानला लपवलं होतं. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola