Jaleel On Sanjay Shirsat : त्यांना लिंबू पाण्याची सवय नाही, देसी नको इंग्लिश घ्या, जलील यांचा शिरसाटांना टोला | ABP Majha
कुंभमेळ्यातील कोठ्यावधीच्या भ्रष्टाचाराची फोकस हटवण्यासाठी अशोक खरातचा मुद्दा आला, आणि अशोक खराचे प्रकरण वळवण्यासाठी TCS चे प्रकरण आणण्यात आले. जितक निदा माझी नातेवाईक आहेत तितकाच अशोक खरात संजय शिरसाठचा नातेवाईक आहे. या शहरामध्ये एकच अनधिकृत घर होते या महाराष्ट्रामध्ये एकही अनाधिकृत घर नाही.. महानगरपालिकेने सांगाव की या शहरांमध्ये एकही अनाधिकृत घर नाही.. या शहरात अनाधिकृत घर असले तरी त्याच्यासाठी काही नियमावली आहे.. त्यासाठी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे.. घर पाडण्याची इतकी काय घाई होती 24 तास ही थांबले नाहीत. काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली तीन वाजता जमा होऊन सहा वाजता ही कारवाई करून टाकली... त्यांना दाखवून द्यायचं होतं आम्ही न्यायव्यवस्थेला मानत नाही म्हणून.. काही चूक त्या मतीन ची असेल पण त्याच्या परिवारालाही शिक्षा देता का?? मतीन च्या माता-पित्याला राहण्यासाठी सुसज्ज आम्ही घर तयार करून देणार.. शिरसाट यांना मी काही महत्त्व देत नाही.. मी रात्री गेलो त्या ठिकाणी भाषण करताना पोलीस उपस्थित होती. त्यांना वाटत असेल मी चिथावणीखोर भाषण केलं तर ते केस रजिस्टर करतील ना.. संजय शिरसाट यांना मी सल्ला देत आहे की त्यांनी स्वतःला आवरा, लिंबू पाणी घ्या बर्फ टाकून.. त्यांना सवय नाही त्यांना मी सल्ला देतो की इंग्रजी घ्या पण ते देशी वर आले आहेत म्हणून ते अशा प्रकारे उलट सुलट बोलत आहेत.. मी अर्बन नक्षली आहे असं ते आरोप करत आहेत मी गुंगा बहिरा नाही मी त्यांच्यापेक्षा दहा पटीने चांगली जीभ माझ्याकडे आहे.. *मी बोलायला सुरुवात केली तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. शिरसाट यांनी पदाचा वापर करून बेकायदेशीर जमीन लाटल्या... मी आतंकवादी दहशतवादी निजामांची अवलाद आहे. तुम्ही तर स्वच्छ प्रतिमेचे आहेत तर एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा.. मी केलेल्या आरोपाची इन्क्वायरी लावा म्हणून.. मग कळेल जेलमध्ये मी असणार आहे की ते असणार आहेत..