Maratha Kranti Morcha : छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात मराठा समाजाचा मोर्चा, काय आहेत मागण्या?
Continues below advertisement
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 58 मोर्चे निघाले. मात्र मराठ्यांच्या 15 मागण्यांपैकी 11 मागण्या अजूनही तशाच आहेत. त्यामुळे जिथून मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मोर्चा निघाला होता, त्याच ठिकाणी आज पुन्हा आंदोलन केले जातेय. संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली आहे . विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर या मोर्चाचा समारोप होईल.
Continues below advertisement