Chhatrapati Sambhajinagar Dowry : फुलंब्रीत हुंड्यासाठी विवाहितेचा अतोनात छळ, सहा जणांना अटक
छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीत हुंड्यासाठी विवाहितेचा अतोनात छळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून पैशांसाठी विवाहितेचा छळ सुरू होता. या प्रकरणी पती अजीम अब्दुल शेख, दीर अजिज, नणंद शबाना आणि रिजवाना, सासू रवाना आणि दाऊस सना या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने सांगितले की, तिला इलेक्ट्रिकल शॉक गनने मारहाण केली जात असे. लग्नानंतर पाच लाख रुपये दिले होते, आता २५ लाख रुपयांची मागणी केली जात होती.
आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी -
आरोपांच्या माऱ्यानंतर विट्स हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय...आरोप करणाऱ्यांनी नव्यानं निघणाऱ्या निविदेत भाग घ्यावा, शिरसाटांचं अंबादास दानवेंना आव्हान...
निवडणुका असल्यानं घाईघाईत निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, अजित पवारांनी केली चूक मान्य...पण वर आता कारवाई करून काय फायदा?, अजितदादांचं वक्तव्य.
नाशकात दोन राजकीय नेत्यांकडील लग्नाची चर्चा...
ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याच्या घरच्या लग्नसोहळ्याला शिंदेंची हजेरी...संजय राऊतांचीही उपस्थिती...तर फडणवीस पुतण्याच्या लग्नासाठी नाशकात...