Chhatrapati Sambhaji Nagar : पाळत ठेऊन होते चोरटे, बँकेतून बाहेर येताच पळवली 3 लाख रोकड
छत्रपती संभाजीनगर शहरात भर दिवसा लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बँकेतून पैसे काढून जात असलेल्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, संधी मिळताच तीन लाखांची बॅग पळवतानाची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्यापारी नवाब जमीर खान पठाण यांनी जिल्हा न्यायालयासमोरील आयसीआयसीआय बँकेतून तीन लाखांची रक्कम काढली. तिथून निघाल्यावर अचानक दोन जण पार्किंग भागात भेटले त्यांनी तुमचे पैसे खाली पडले आहेत असं म्हणत त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे पैसे माझे नसल्याचे उत्तर नवाब जमीर खान पठाण यांनी दिलं, आणि ते पुढे निघून गेले. मग या जोन चोरट्यांनी पठाण यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर पठाण यांना आपली दुचाकी पंक्चर असल्याचं लक्षात आलं तिथून त्यांनी गाडी ढकलून क्रांती चौक पेट्रोल पंप वर नेली आणि तिथेच या चोरांनी डाव साधत तीन लाखांची बॅग पळवली.