Chhatrapati Sambhaji Nagar clashes : मालाडच्या मालवणी परिसरातही 2 गटात राडा, परिस्थिती नियंत्रणात

संभाजीनगरनंतर मालाडच्या मालवणी परिसरातही 2 गटात राडा झाला आहे. यामध्ये 2 जण जखमी झालेत. मालवणी पोलीस स्टेशनसमोर हा प्रकार घडला. रामनवमीच्या शोभायात्रेत मालवणी गेटनंबर 5 जवळ 2 गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आणि तणाव निर्माण झाला.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. एकंदरीतच संभाजीनगरच्या राड्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्याने राज्यात तणावाचं वातावरण आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola