Shirdi Sai Baba | साईबाबांच्या हक्कावरून शिर्डी- पाथरीत चढाओढ ! | ABP Majha
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या मुद्द्यावरुन शिर्डीकर आता आणखी आक्रमक झालेत. इतिहासात पहिल्यांदाच शिर्डीकरांनी उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंदची हाक दिली आहे. या बंदला शिर्डी शहरानजीकची २५ गावं पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळतेय. तरी, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटीलही आज शिर्डी ग्रामस्थांसोबत बैठक घेणार आहेत. तर, बंदआधी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शिर्डी ग्रामसभेची विशेष सभा आज संध्याकाळी आयोजित करण्यात आली.