Tadoba | ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आजपासून खुला
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन पर्यटकांसाठी आज पासून खुला करण्यात आला आहे. तब्बल ६ महिन्यानंतर ताडोबा पर्यटकांसाठी खुलं होणार असून 18 मार्च पासून ताडोबा कोरोनामुळे बंद आहे. मात्र कोविड 19 चा अटकाव करण्यासाठी काही अटी-शर्ती पर्यटकांसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. ज्या मध्ये एका जिप्सी मध्ये आता 6 ऐवजी 4 पर्यटक बसवणे, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना पर्यटनासाठी बंदी आणि मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक करण्यात आले आहे तर कोविड सदृश्य लक्षणं आढळल्यास एखाद्या पर्यटकाला प्रवेश नाकारणार येणार आहे.