Tadoba National Park : बौध्द पौर्णिमेनिमित्त ताडोबा व्याघ्रप्रकल्पात मचाण सेन्सस : ABP Majha
Continues below advertisement
बौध्द पौर्णिमेनिमित्त ताडोबा व्याघ्रप्रकल्पात मचाण सेन्सस म्हणजे निसर्गानुभव घेण्यात आला. काल संध्याकाळी ६ ते आज सकाळी ६ पर्यंत मचाण सेन्ससचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी राज्यासह देशभरातून हौशी पर्यटक ताडोबात दाखल झाले होते. मचाण सेन्ससमध्ये सामील झालेले पर्यटक खाण्या-पिण्याचं साहित्य, टॉर्च, नोंदवही आणि इतर आवश्यक साहित्य घेवून रात्रभर मचानींवरून वन्यप्राण्यांचं निरीक्षण करत होते... कॅमेरा ट्रॅप, ट्रान्झिट लाईन मेथड या सारख्या वन्यप्राणी गणनेच्या आधुनिक पध्दती वापरात येण्याआधी मचाण सेन्सस हीच वन्यप्राणी गणनेची सर्वमान्य आणि सोपी पध्दत होती.
ताडोबाच्या बफर झोनमध्ये असलेल्या जवळपास ७० पाणवठ्यांवर हा मचाण सेन्सस घेण्यात आला.
Continues below advertisement