चंद्रपुरात OBC समाजाचा मोर्चा, जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी

OBC जातनिहाय जनगणना व्हावी या प्रमुख मागणीसाठी चंद्रपुरात ओबीसी  मोर्चा आयोजित करण्यात आलाय. दीक्षाभूमी मैदानातून शहराचे भ्रमण करत चांदा क्लब मैदानावर या मोर्चाचा समारोप होणार आहे. मराठ्यांचे आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले जाऊ नये असा इशारा सरकारला देण्यासाठी हा मोर्चा महत्वाचा ठरणार आहे. मोर्चात जिल्हाभरातुन महिला पुरुषांची मोठी उपस्थिती आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आयोजक कोरोना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देत आहेत. ओबीसी जात घटकांतील नागरिकांच्या नोकरी- शिक्षणाच्या आरक्षण संदर्भातील अन्याय दूर करण्याची मागणी केली जात आहे.
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola