Hansraj Ahir यांचे बंधू हितेंद्र अहीर यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा
चंद्रपूरचे माजी खासदार आणि भाजप नेते हंसराज अहीर यांचे बंधू हितेंद्र अहीर यांच्या मृत्यूप्रकरणी आता डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वतः हंसराज अहीर यांनीच केलेय... त्यांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात तक्रार दिलेली आहे... महिनाभरापूर्वी हितेंद्र अहीर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना डॉ विश्वास झाडे यांच्या खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं.. मात्र तिथे उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप हंसराज अहीर यांनी केलाय...