Narendra Modi Mumbai Doura : मुंबईत नरेंद्र मोदींच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर


Narendra Modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणा-या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. 10 फेब्रुवारी म्हणजेच, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या रवाना होतील. सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेन बनवण्यात आल्यात. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड ट्रेन आहे. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बैक सीट्स अशी या रेल्वेची खासियत असणार आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola