Tiger Chandrapur :चंद्रपूरमधील दोन वाघांच्या झुंजीचा कथित व्हिडिओ, वन्यजीव प्रेमी संभ्रमात
चंद्रपूरच्या वहानगाव शेतशिवारात दोन वाघांच्या झुंजीत मंगळवारी बजरंग नामक वाघाचा मृत्यू झाला होता. वाघांच्या या झुंजीचा कथित व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. मात्र या व्हिडीओबाबत वन्यजीवप्रेमी देखील संभ्रमात आहेत. छोटा मटका आणि बजरंग यांच्या झुंजीत बजरंग वाघाने प्राण सोडले होते. हा व्हिडीओ वायरल झाल्यावर दोन वाघांच्या लढाईचे एवढ्या जवळून व्हिडीओ काढणं अशक्य असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलीय.